top of page

नेत्रतर्पण चिकित्सा

  • Writer: Dr. Snehal Nikam
    Dr. Snehal Nikam
  • 2 days ago
  • 1 min read

डोळ्यांच्या विविध विकारांमध्ये फायदेशीर ठरणारी विशिष्ट उपचार पद्धत म्हणजे नेत्रतर्पण होय. नेत्र म्हणजे डोळा आणि तर्पण म्हणजे पोषण करणारी, यालाच अक्षितर्पण किंवा नेत्रबस्ती ही म्हटले जाते.

नेत्र हे आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी महत्त्वाचे इंद्रिय आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील बऱ्याच क्रिया डोळ्यांवर अवलंबून असतात. आताच्या काळात सतत कॉम्प्युटरवर काम, मोबाईलचा वाढता वापर यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण-तणाव येतो. आपण बघू शकता की अगदी शाळेत जाणाऱ्या बहुतांश लहान मुलांनाही चष्म्याचा वापर करावा लागतो. टेक्नॉलॉजीचा अतिरिक्त वापर, खाण्या-पिण्याच्या, झोपेच्या चुकीच्या सवयी, योग्य स्थितीत अभ्यास न करणे इत्यादी कारणे यामागे आहेत. आपल्या डोळ्याचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी नेत्रतर्पण हा एक प्रभावी उपाय आहे.

खालील अवस्थांमध्ये आपण नेत्र तर्पण करू शकतो -

1) नेत्र शुष्कता ( Dryness at eye region) -

डोळ्यांच्या ठिकाणी सतत कोरडेपणा जाणवणे

2) नेत्र स्तब्धता ( Stiffness and Rigidity at eye region) - डोळ्यांच्या ठिकाणी स्तब्धपणा जाणवणे किंवा जखडल्याप्रमाणे भासणे.

3) नयने ताम्यती ( feeling of darkness in front of eye) - प्रकाश सहन न झाल्यामुळे डोळ्यांसमोर अंधारे आल्यासारखे वाटणे.

4)अति दारुण ( Eye appear to be hardened) - डोळे कडक झाल्यासारखे वाटणे.

5) शीर्ण पक्ष्म (Eye lashes falling down) - पापण्यांचे केस गळणे.

6)आविल नेत्रता ( Dirtiness of eye) - डोळे स्वच्छ ना दिसणे.

7) जिह्म नेत्रम ( Abnormal Deviation of eye ball)

8) रोग क्लिष्टम - ज्याला सतत, पुन्हा पुन्हा डोळ्यांचे विविध आजार होत आहेत.

9)अभिघात - डोळ्याला मार लागणे.

10) डोळे उघडण्यास कष्ट पडणे.

11) स्पंद - डोळ्यातून सारखे पाणी गळणे.


नेत्राचे बल राखण्याकरता नस्य अंजन व तर्पण इत्यादीच्या योगाने सर्वस्वी झटावे ; कारण दृष्टीचा जर नाश झाला तर एका क्षणात विविध रूपात्मक सर्व जगत तमोमय व एकरूप होऊन जाते.

 
 
 

Comments


bottom of page