संवाद ओपीडी मधला - ' सुवर्णप्राशन'
- Dr. Snehal Nikam

- May 31
- 2 min read
'अगं, आजकाल राघव सारखा आजारी पडतो बघ, व्यवस्थित जेवण करत नाही, थोडं वातावरण बदललं की लगेच त्याला त्रास होतो'. मोनिका आपली प्रिय मैत्रीण रेखाला फोनवर सांगत होती. खूप ठिकाणी उपचार घेऊन झाले तात्पुरता फरक पडतो पण पुन्हा आजारी पडतो, त्याचा त्रास बघवत नाही ग आता.. काय करू काही सुचत नाहीये. मोनिकाचे बोलणे रेखाने शांततेने ऐकून घेतले आणि तिला राघवला एकदा सुवर्णप्राशन देऊन बघ असा सल्ला दिला.
मोनिकाला लगेच आठवलं अरे! राघवच्या नर्सरी स्कूल समोर तत्त्वमसि क्लिनिकला आपण सुवर्णप्राशन चा बोर्ड बघितलाय यापूर्वी. लगेच तिने क्लीनिक मध्ये भेटून याविषयी अधिक माहिती घेण्याचे ठरवले.
मोनिका : डॉक्टर मला सुवर्णप्राशन विषयी माहिती हवी होती, माझ्या मैत्रिणीने मला याविषयी सांगितलं.
डॉक्टर : सुवर्ण प्राशन म्हणजे शाश्त्रोक्त पद्धतीने औषध सिद्ध घृत ( तूप), शुद्ध सुवर्णभस्म आणि मध एकत्र करून बालकांना चाटवणे.
मोनिका : किती वर्षांपर्यंतच्या बाळांना आपण ते देऊ शकतो ?
डॉक्टर : जन्म झालेल्या बालकापासून ते सोळा वर्षापर्यंत आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो.
मोनिका : सुवर्णप्राशन देण्याचे फायदे काय आहेत?
डॉक्टर : सुवर्ण प्राशन देण्याचे अनेक फायदे आहेत जसे_
1) बालकांची स्मृती, एकाग्रता, बुद्धी आणि आकलन शक्ती वाढते.
2) भुक आणि पाचनशक्ती वाढते.
3) रोगप्रतिकार शक्ती वाढते.
4) बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि पडले तरी लवकर रिकव्हर होते.
5) चिडचिडेपणा कमी होतो.
6) बालकांच्या सर्वांगीण वाढीसाठी उपयुक्त.
यासाठी बऱ्याच ठिकाणी क्लीनिकल स्टडी सुद्धा झाले आहेत आणि त्यात सुवर्णप्राशन बालकांच्या विकासात फायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मोनिका : अच्छा ! सुवर्ण प्राशन केव्हा देऊ शकतो?
डॉक्टर : प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पूष्ण नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन देतात, परंतु सुरुवातीच्या काळात
मेंदूचा विकास झपाट्याने होत असल्याने कमीत कमी सहा महिने रोज सकाळी उपाशीपोटी सुवर्णप्राशन देणे फायदेशीर ठरते.
मोनिका : माझ्या मुलाला मी सुवर्णप्राशन देऊ इच्छिते.
डॉक्टर: चालेल! सुवर्ण प्राशन उपलब्ध आहे अगदी उद्याच तुम्ही ते सुरू करू शकता.आपल्या पाल्याच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी वेळीच योग्य निर्णय घेतल्याबद्दल तुमचेही अभिनंदन!
डॉ. स्नेहल बोरसे - निकम ( एम. डी. आयुर्वेद)

Comments