top of page

पथ्य पालन म्हणजे शिक्षा असं तुम्हालाही वाटतं का?

Writer: Dr. Snehal Nikam
Dr. Snehal Nikam
Sep 5
1 min read

Updated: Sep 13


छान संध्याकाळी गणपती मंदिराच्या प्रांगणात गप्पा रंगल्या होत्या.

अचानक गप्पांमध्ये विषय आला – "आयुर्वेदात पथ्य फार असतात!"

आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून सगळ्यांच्या माना माझ्याकडे वळल्या.

"काय म्हणता वाहिनी? बरोबर ना?"

मी हसते. त्या हसण्यात थोडा पथ्यविषयींचा गैरसमज दूर करायची तयारी असते.


"पथ्य म्हणजे काय हो?"

मी उत्तर न देता उलट प्रश्न केला.


एक म्हणाली, "हे खाऊ नका, ते करू नका असं बरंच काही असतं."

"थोडक्यात म्हणजे आहार आणि विहारातील बदल म्हणजे पथ्य, बरोबर ना?"

"हो!" – सगळ्यांनी मान्यता दिली.


माझा पुढचा प्रश्न – "मग जर एका बाजूने तुम्ही औषधी घेत आहात आणि दुसऱ्या बाजूने असे काही करत आहात, ज्याने तो आजार वाढेल, तर लवकर बरे वाटेल का?"

"नाही ना?"


‘पथ’ म्हणजे मार्ग, आणि त्या चिकित्सेच्या मार्गात अडथळा न आणणारे म्हणजेच पथ्य – ही पथ्याची साधी, सोपी व्याख्या.


"आता तुम्हीच सांगा, औषधी चिकित्सेबरोबर पथ्य पाळल्यास काय फायदे होतील?"


"आजार लवकर बरा होईल."

"औषधी लवकर बंद होतील."

"अपथ्यमुळे शरीराची झालेली हानी लवकर भरून निघेल."

"आजार पुन्हा फिरून येणार नाही."


बघा, तुम्हीच किती फायदे सांगितले पथ्य पालन करण्याचे!


आयुर्वेदातील श्रेष्ठ चिकित्सा ग्रंथ चरक सहितेत आचार्य चरकांनी पथ्याला 'औषधाचा पर्याय' सांगितला आहे.

आचार्य सुश्रुत म्हणतात – 'निदान परिवर्जन' म्हणजे ज्यामुळे आजार झाला, त्या गोष्टी न करणे – हीच थोडक्यात चिकित्साच आहे.


"थँक्यू वाहिनी! आज पथ्याविषयीचे गैरसमज दूर केल्याबद्दल. आम्ही सगळे आनंदाने पथ्यपालन करू!"


"पथ्य म्हणजे बंधन नव्हे – उपचाराचा मार्ग!"


गणपती मंदिरातल्या एका संध्याकाळीच्या गप्पांमधून पथ्याविषयीचे गैरसमज दूर झाले...

आयुर्वेदात पथ्य ही शिक्षा नसून, आजारमुक्त होण्याची वाट असते.

पथ्य समजून घेतलं, की औषधांची गरजही कमी होते!


डॉ. स्नेहल बोरसे - निकम (तत्वमसि आयुर्वेद,पुणे.) ( 9763083580)



#आयुर्वेद #पथ्य #आयुर्वेदिकचिकित्सा #आरोग्यदायकजीवन #Pathya #AyurvedaWisdom #HealthThroughAyurveda #तत्वमसिहेल्थक्लिनिक

 
 
 

Comments


bottom of page