top of page

"पावसाळा आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी"

  • Writer: Dr. Snehal Nikam
    Dr. Snehal Nikam
  • Aug 9
  • 1 min read

प्रश्न–उत्तरातून जाणून घेऊया!


❓ पावसाळ्यात ज्येष्ठ व्यक्तींनी विशेष काळजी का घ्यावी?

👉 वय वाढल्यावर शरीराची प्रतिकारशक्ती, पचनशक्ती थोडी नाजूक असते. वातावरणातील बदलांमुळे लगेच त्रास जाणवू शकतो. वृद्धावस्था वात दोष प्राधान्याची असते, पावसाळ्यातील गारव्यामुळे वात अधिक वाढून वेगवेगळे त्रास होऊ शकतात.


❓ पावसाळ्यात ज्येष्ठांना कोणते त्रास जास्त होतात?

👉 सांधेदुखी, गुडघे आखडणे, अपचन, सूज, थकवा, सर्दी-खोकला, त्वचाविकार, झोपेचे व मूत्रविकार यांचा त्रास होऊ शकतो.


❓ काय काळजी घ्यावी?

👉 शरीर उबदार ठेवावे. गरजेनुसार मफलर, स्वेटर, मोजे वापरावेत. शरीर कोरडे ठेवावे. पोट नियमित साफ होईल याची काळजी घ्यावी.


❓ कसा आहार घ्यावा?

👉 ताजा, गरम आणि सहज पचणारा आहार घ्यावा.

🥣 सुप, कढण, लापशी, मूगाची खिचडी यांसारखे पदार्थ उपयोगी ठरतात.

👉 शक्यतो उकळून कोमट केलेले पाणी तहान असेल तेव्हा प्यावे.

बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नये.


❓ तूप आणि तेल आहारात घ्यावे का?

👉 योग्य प्रमाणात तूप/तेल घेतल्याने शरीरातील कोरडेपणा कमी करण्यास आणि वात संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.


❓ अभ्यंग म्हणजे तेल लावणे — ते ज्येष्ठांसाठी उपयोगी आहे का?

👉 हो. योग्य पद्धतीने केलेला नियमित अभ्यंग त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास व शरीराला आराम देण्यास मदत करू शकतो. अभ्यंगामुळे दोष दोष कमी होऊन, वेदना कमी होतात.


❓ स्नानासाठी कोणते पाणी वापरावे?

👉 कोमट पाण्याने स्नान करणे अधिक आरामदायक ठरते. गार पाणी टाळावे.


❓ काय टाळावे?

👉 शिळे, अतिजड, खूप तेलकट आणि वारंवार बाहेरचे अन्न टाळावे.


❓ पंचकर्म ज्येष्ठांसाठी उपयोगी आहे का?

👉 आयुर्वेदात बस्तीला श्रेष्ठ वातशामक चिकित्सा मानले जाते. पावसाळ्यात सर्वांनी बस्ती अवश्य करावी. वय, प्रकृती आणि आजारांची स्थिती पाहून तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच बस्ती करावी. त्याचप्रमाणे मन्यबस्ती, कटिबस्ती, जानुबस्ती यासारखे कर्मही फायदेशीर ठरतात.


🙏 या पावसाळ्यात घरातील ज्येष्ठांना थोडं अधिक जपूया…

कारण त्यांनी आपल्याला आयुष्यभर जपलंय! 🌿


डॉ. स्नेहल निकम ( एम. डी. आयुर्वेद)

तत्वमसि हेल्थ क्लिनिक, धनकवडी, पुणे.

 
 
 

Comments


bottom of page