top of page

शिरोभ्यंग

  • Writer: Dr. Snehal Nikam
    Dr. Snehal Nikam
  • Aug 2
  • 2 min read


दिनचर्येंत समाविष्ट असलेला महत्वाचा उपक्रम म्हणजे अभ्यंग..!


प्रश्न: शिरोभ्यंग म्हणजे काय?

उत्तर: शिरप्रदेशी तेल लावून मालिश करणे म्हणजे शिरोभ्यंग होय.


प्रश्न : आजकाल केसांना नियमित तेल फारच कमी लोक लावतात, तरुण मुला-मुलींना तर ते तेलकट केस अजिबात आवडत नाही.

उत्तर:

अगदी खर आहे, सध्याच्या फॅशनच्या नादात या महत्वाच्या गोष्टी मागे पडत चालल्या आहेत आणि त्यासोबत केसांशी संबंधित वेगवेगळ्या समस्याही वाढत आहेत. बघा ना आपल्या आजी आजही रोज तेल लावून छान केस विंचरतात, जुडा बांधून केस पॅक करतात, नातवंडांनाही तेल लाव म्हणून सतत सांगत असतात पण कोणी ऐकत नाही. कारण केसांच्या आरोग्यापेक्षा फॅशन जास्त महत्वाची..! गेलेच केस या नादात तर विग आहेच लावायला, आता आर्टिफिसिअल केस उद्योगाला खूप महत्व येणार हे नक्कीच.


प्रश्न: शिरोभ्यंग कोणी करावा आणि कधी करावा?

उत्तर:

प्रत्येकाने शिरोभ्यंग रोज करावा. आयुर्वेदानुसार शीर ( डोके), श्रवण ( कान) आणि पाय या ठिकाणी विशेष करून रोज न चुकता तेल लावायला सांगितले आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळे बॉडी लोशन लावून शरीराची काळजी घेतली जाते तिच गोष्ट केशभूमी ( scalp) ची पण आहे, ती त्वचा पण कोरडी होते म्हणुन तेल लावायला हवेच. रोज अभ्यंग केल्यास त्वचा सुंदर, निरोगी राहील आणि कोणत्या लोशनची पण गरज भासणार नाही.


प्रश्न: शिरोभ्यंगाचे फायदे काय?

उत्तर:

1) केश्य - केसांची वाढ सुधारते ,केसांचे पोषण होते, गळती कमी होते आणि केस लवकर पांढरे होण्याची समस्या कमी होते.

2) मानसिक तणाव कमी होतो.

3) डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

4) झोप चांगली लागते.

5) डोकेदुखीपासून आराम – मायग्रेन आणि इतर प्रकारच्या डोकेदुखीवर फायदेशीर आहे.

6) रक्ताभिसरण सुधारते – डोक्यातील आणि चेहऱ्याभोवतालच्या रक्ताभिसरणात सुधारणा होते.


प्रश्न: शिरोभ्यंगासाठी कोणते तेल वापरावे?

उत्तर:

साधारणत: नारळाचे तेल वापरू शकता, किंवा तक्रारी नुसार वैद्यांच्या सल्ल्याने सिद्ध तेल ही वापरू शकता.


शिरोभ्यंग केवळ केसांच्या संबंधित नसून नियमित केल्यास संपूर्ण शरीर आणि मन निरोगी राहते, कारण संपूर्ण शरीर चालणारे महत्वाचे स्थान हे मस्तिष्क आहे..!


डॉ. स्नेहल बोरसे - निकम

तत्वामसि आयुर्वेद, पुणे (9763083580)

 
 
 

Comments


bottom of page